जिथं सुंदर निसर्ग असेल, शुद्ध हवा असेल, खळाळते निर्झर असतील! सूर्योदय आणि सूर्यास्ताचं अप्रतिम दर्शन होईल किंवा धुक्याची दुलई तरी अंथरलेली असेल! पक्ष्यांचा किलबिलाट, सुंदर फुलपाखरं आणि प्रत्येक ऋतूमधील सह्याद्रीचं आगळं रूप अनुभवायला मिळेल! कोयनेच्या मनोहारी जलाशयाचं दर्शन होईल आणि डोंगराच्या कडेकपारींमध्ये अथवा घनदाट जंगलामध्ये मुक्त भ्रमंती करता येईल! लाल मातीच्या रस्त्यांवरून रपेट करताना ती मृदा आपल्यालाही लालिमा देईल आणि कातळांचे अद्भुत आकार पाहताना कधी आश्चर्य वाटेल तर कधी अंगावर काटाही उभा राहील! विस्तीर्ण जलाशयामध्ये मनमुराद खेळताना भान हरपून जाईल आणि वृक्षवेलींशी-फळाफुलांशी हितगुज करताना मन वेडावून जाईल! इथली अनेक आश्चर्यकारक सुंदर ठिकाणं निसर्गानं केवळ आपल्याचसाठी तयार केली आहेत याची अनुभूती येईल! इथं ग्रामीण आणि शेतकरी जीवन जवळून पाहता येईल अथवा त्याचा आनंदही घेता येईल! आपले हरवलेले पारंपारिक खेळ इथं मनसोक्त खेळता येतील.
गर्दीतून दूर, तरीही पोहोचायला सोयीचं, बाराही महिने एसी अथवा पंख्याविनाही आल्हाददायक वातावरणाचा आनंद देणारं, निसर्गाचं अनाघ्रात सौंदर्य, सोबत मस्त रुचकर शाकाहारी भोजन आणि जिवंत झऱ्याचं पाणी असणारं, मानवनिर्मित कृत्रिम साधनांऐवजी खऱ्याखुऱ्या निसर्गाचा आनंद देणारं, असं ठिकाण म्हणजेच विंडी हिल्स!
याच निसर्गाच्या अविष्कारात हरवून जाण्यासाठी, सह्याद्रीच्या जागतिक वारसा क्षेत्रामध्ये साकारतंय विंडी हिल्स हे कृषी पर्यटन केंद्र! आज केवळ सुरुवात होतेय. आता यायचं आहे ते केवळ ट्रेलर पाहण्यासाठी. पराकाष्ठेनं खास निसर्ग प्रेमींसाठी साकारत असलेल्या आमच्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये भविष्यात असंख्य गमती आकाराला येणार आहेत.
काय होणार, कसं होणार, केंव्हा होणार हा विभ्रम न बाळगता, काहीतरी नक्कीच अफलातून घडणार याची मनाशी खूणगाठ बांधावी आणि आपण या ठिकाणाचे बाल्यावस्थेपासूनचे साक्षीदार व्हावं, किंबहुना आपणही या निसर्गाचे भागीदार व्हावं! आपलंच बोट धरून हा प्रकल्प रांगावा, उभा राहावा आणि धावावासुध्दा! याचसाठी इथं सतत येऊन इथलेच होऊन जावं, या करिता आपणांस आग्रहाचं निमंत्रण!